Advertisement

मोबाईल चोरीची तक्रार दिल्याने 'त्या' तरुणाचा खून

प्रजापत्र | Wednesday, 12/04/2023
बातमी शेअर करा

बीड दि.१२ (प्रतिनिधी)-मोबाईल चोरीची तक्रार दिल्याच्या क्षुल्लक कारणावरून बीडमधील एका २५ वर्षीय तरुणाचा खून काल रात्री करण्यात आला होता.याप्रकरणी मयताची ओळख पटवून आरोपींचा शोध लावण्याचे आव्हान ग्रामीण पोलिसांसमोर होते. मात्र २४ तासाच्या आत त्या मयताची ओळख पटली असून खून करणाऱ्या दोघांचे नावे देखील समोर आले आहेत. सध्या पोलीस या दोघांचा शोध घेत असल्याची माहिती ग्रामीण ठाण्याचे पोलीस निरीक्षक संतोष साबळे यांनी दिली. 
      धुळे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील बिंदुसरा धरणाजवळ अक्षय राजेंद्र मडकर (वय-२४ रा.अंकुश नगर) याचा डोक्यात दगड घालून खून करण्यात आला होता.मयताची ओळख पटवून गुन्ह्याचा तपास करण्याचे आव्हान पोलिसांमोर होते.मात्र बीड ग्रामीण पोलिसांनी अवघ्या २४ तासात याप्रकरणाचा छडा लावला असून मोबाईल चोरीची तक्रार दिल्याने अक्षय मडकरचा रोहन प्रकाश जाधव व वैभव क्षीरसागर (रा.दोघे धानोरा रोड) यांनी खून केल्याचे पोलीस तपासातून समोर आल्याची माहिती पोलीस निरीक्षक संतोष साबळे यांनी दिली.दरम्यान दोन्ही आरोपींच्या मागावर पोलिसांचे पथक असून लवकरच त्यांना अटक करण्यात येईल असे श्री.साबळे यांनी म्हटले आहे. 

Advertisement

Advertisement