बीड - चोरट्यांनी लंपास केलेल्या मोबाईचा शोध बीड पोलिसांना लावण्यात यश आले असून त्यांनी तब्बल 15 मोबाईल चोरट्यांकडून जप्त करत ते तक्रारदारांना परत केले आहेत.
बीड जिल्ह्यातील विविध भागातून चोरीला गेेलेल्या मोबाईलच्या तक्रारी त्या त्या पोलिस ठाण्यात दाखल होत्या. या प्रकरणी पोलिसांनी शोध लावून 15 मोबईल जप्त केले आहेत. ते तक्रारदारांना आज अप्पर पोलिस अधिक्षक सचिन पाडकर, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरिक्षक सतिष वाघ यांनी परत केले. ही कारवाई पोलिस अधिक्षक नंदकुमार ठाकुर, अप्पर पोलिस अधिक्षक सचिन पाडकर, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरिक्षक सतिष वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरिक्षक भगतसिंग दुल्लत, सफो सलीम शेख, पोअ विकी सुरवसे, शंकर डोंगळे, ऋषीकेश पोटे यांनी केली.
बातमी शेअर करा