राज्यात पुन्हा पुढील पाच दिवस अवकाळी पावसाचा अंदाज भारतीय हवामान विभागाने वर्तविला आहे. मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात पुढील पाच दिवस विजांच्या कडकडाटासह काही ठिकाणी पुन्हा गारपिटीची शक्यता वर्तविण्यात येत आहे. विदर्भात काही ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज वर्तविण्यात येत आहे. 13 आणि 15 एप्रिलला काही ठिकाणी गारपिटीची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.
बातमी शेअर करा