Advertisement

शिवसेना भवन ताब्यात द्या

प्रजापत्र | Monday, 10/04/2023
बातमी शेअर करा

शिवसेना आणि धनुष्यबाण मिळाल्यानंतर शिंदे गटाने पुन्हा न्यायालयात धाव घेतली आहे. शिवसैनिकांचे मंदिर अशी ओळख असलेल्या शिवसेना भवनाचा आणि शिवसेनेच्या शाखांचा ताबा शिंदे गटाकडे द्या, अशी मागणी शिंदे गटाचे वकील आशिष गिरी यांनी केली आहे. याबाबत गिरी यांनी न्यायालयात हस्तक्षेप याचिका दाखल केल्याची माहितीही समोर आली आहे. तसेच, या याचिकेवर २४ एप्रिलला सुनावणी घेण्याची मागणीही गिरी यांच्या वतीने करण्यात आली आहे. 

गिरी यांनी दिलेल्या माहितीनुसार, मी वकील असण्यासोबत एक मतदार सुद्धा आहे. म्हणुन मी ही हस्तक्षेप याचिका दाखल केली आहे. ही याचिका मी माझ्या बाजून दाखल केली आहे. मी कोणाच्याही बाजूने ही याचिका दाखल केलेली नाही. उद्या जर सर्वोच्च न्यायालयाने शिवसेना भवन उद्धव ठाकरे यांच्याकडे दिले तर ते त्यांच्याकडेच राहिल पण जर निवडणूक आयोगाच्या निर्णयानुसार ते एकनाथ शिंदे यांच्याकडे दिले तर ते त्यांच्याकडे जाईल.

Advertisement

Advertisement