कॅनबेरा : टीम इंडियाने पहिल्या टी 20 सामन्यात ऑस्ट्रेलियावर 11 धावांनी विजय मिळवला आहे. यासह टीम इंडियाने 3 टी 20 सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. टीम इंडियाने ऑस्ट्रेलियाला विजयासाठी 162 धावांचे आव्हान दिले होते. मात्र ऑस्ट्रेलियाला निर्धारित 20 ओव्हरमध्ये 7 विकेट्स गमावून 150 धावाच करता आल्या. ऑस्ट्रेलियाकडून कर्णधार अॅरॉन फिंचने सर्वाधिक 35 धावा केल्या. तर डॉर्सी शॉटने सर्वाधिक 34 धावांची खेळी केली. मोईसेस हेनरिकेसनेही 30 धावा केल्या. टीम इंडियाकडून फिरकीपटू युजवेंद्र चहल आणि पदार्पण केलेल्या थंगारासू नटराजनने प्रत्येकी 3 विकेट्स घेतल्या. तर दीपक चाहरने 1 विकेट घेतला.
त्याआधी ऑस्ट्रेलियाने टॉस जिंकून टीम इंडियाला बॅटिंगसाठी भाग पाडले. टीम इंडियाने 20 ओव्हरमध्ये 7 विकेट्स गमावून 161 धावा केल्या. टीम इंडियाकडून केएल राहूलने सर्वाधिक 51 धावा केल्या. यामध्ये त्याने 5 फोर आणि 1 सिक्स लगावला. तर रवींद्र जडेजाने 23 चेंडूत 5 फोर आणि 1 सिक्सच्या मदतीने तडाखेदार नाबाद 44 धावा केल्या. ऑस्ट्रेलियाकडून मोईसेस हेनरिकेसने सर्वाधिक 3 विकेट्स घेतल्या. मिचेल स्टार्कने 2 फलंदाजांना माघारी पाठवलं. तर अॅडम झॅम्पा आणि मिचेल स्वीपसन या जोडीने प्रत्येकी 1 विकेट मिळवला. दरम्यान दुसरा टी 20 सामना 6 डिसेंबरला खेळण्यात येणार आहे.
हेही वाचा