Advertisement

पुन्हा एका कुंटणखान्यावर पोलिसांचा छापा

प्रजापत्र | Thursday, 06/04/2023
बातमी शेअर करा

बीड-येथून जवळच असलेल्या मांजसुंबा येथे प्रशिक्षणार्थी पोलीस उपअधीक्षक श्वेता खाडे व गुन्हे शाखेच्या पोलिसांनी आज दुपारी एका कुंटणखान्यावर छापा मारून एका आंटीला ताब्यात घेतले आहे.यावेळी पीडित महिलेची सुटका पोलिसांनी केली असून याप्रकरणी नेकनूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
    मांजसुंबा येथील उड्डाणपुलाच्या बाजुलाच एका पत्र्याच्या शेडमध्ये कुंटणखाना चालत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्याप्रमाणे सापळा लावून डमी ग्राहक पाठविण्यात आला. आंटीने पैसे स्विकारता ही कारवाई करण्यात आली. जयाबाई लांडगेविरोधात नेकनूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर, पोलिस निरीक्षक सतीश वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशिक्षणार्थी पोलीस उपअधीक्षक श्वेता खाडे, स्थानिक गुन्हे शाखेचे पाेलिस उपनिरीक्षक श्रीराम खटावकर, पोह मारोती कांबळे, बाळासाहेब जायभाये, जफर पठाण, संजय जायभाये आदींनी केली.

Advertisement

Advertisement