दिल्ली - इंडियन प्रीमिअर लीग २०२३ मध्ये आज दिल्ली कॅपिटल्सचा संघ घरच्या मैदानावर म्हणजेच दिल्लीच्या अरुण जेटली स्टेडियमवर खेळणार आहे. पहिल्या सामन्यात दिल्लीला पराभव पत्करावा लागला आणि आज ते दुसरा सामना खेळणार आहेत. या सामन्यात रिषभ पंत स्टेडियमवर संघाचे मनोबल वाढवण्यासाठी हजर राहणार आहे. रिषभचा गेल्या वर्षी कार अपघात झाला होता आणि त्यामुळे त्याला आयपीएल २०२३ मधून माघार घ्यावी लागली. आता डेव्हिड वॉर्नर दिल्लीचे कर्णधारपद सांभाळत आहे.
दिल्ली कॅपिटल्स आज गुजरात टायटन्सविरुद्ध खेळणार आहेत. या सामन्यात रिषभ पंत स्टेडियमवर उपस्थित राहणार आहे.पीटीआयच्या वृत्तानुसार, दिल्ली आणि जिल्हा क्रिकेट असोसिएशनने देखील या वृत्ताला दुजोरा दिला आहे.
बातमी शेअर करा