Advertisement

वन रँक पेन्शनसाठी माजी सैनिकांचा जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा

प्रजापत्र | Monday, 03/04/2023
बातमी शेअर करा

बीड - देशभरातील माजी सैनिकांना वन रँक वन पेंशन मिळावी यासाठी आज सोमवार दिनांक ३ एप्रिल रोजी माजी सैनिकांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. देशातील माजी सैनिकांवर वन रँक वन पेन्शन मध्ये झालेल्या अन्यायाविरुद्ध दिल्ली येथील जंतर मंतर मैदानावर माजी सैनिक आंदोलन करीत आहेत. या मागणीच्या समर्थनार्थ आज सोमवारी जिल्ह्यातील माजी सैनिकांनी छत्रपती शिवाजी महाराज चौकापासून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत मोर्चा काढला होता. या मोर्चामध्ये जिल्ह्यातील शेकडो माजी सैनिक परिवारासह सहभागी झाले होते. मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकारी यांना देण्यात आले.

Advertisement

Advertisement