Advertisement

शेतीच्या वादातून तरुणास कुर्‍हाडीने मारहाण

प्रजापत्र | Monday, 03/04/2023
बातमी शेअर करा

वडवणी - तालुक्यातील ढोरवाडी येथे शेतीच्या वादातून एकास दोघा जणांनी कुर्‍हाडीने मारहाण केल्याची घटना आज सकाळी घडली आहे. जखमीवर बीडच्या जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
प्रवीण अण्णासाहेब बिक्कड व शिवाजी चोले यांच्यामध्ये शेतीचा वाद आहे. आज सकाळी प्रवीण बिक्कड हे पाणी देण्यासाठी शेतात गेले होते. या वेळी वाद होऊन त्यांना शिवाजी चोले आणि विष्णू चोले या दोघांनी कुर्‍हाडीने मारहाण करून जखमी केले. यात ते गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर बीडच्या जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

Advertisement

Advertisement