Advertisement

३२ वर्षीय विवाहित महिलेचा बलात्कार

प्रजापत्र | Friday, 31/03/2023
बातमी शेअर करा

वडवणी - ऊसतोडणी कामगार मुकादम असणार्‍या इसमाने ३२ वर्षीय महिलेला ऊसतोडणीची उचल देतो लॉजवर ये असे बोलून लॉजवर आलेल्या महिलेचा बळजबरीने शाररिक संबध ठेवून बलात्कार केल्याची घटना काल वडवणी शहरातील भागिरथी लॉजवर घडली असून पिडित विवाहित महिला व आरोपी हे उपळी येथील रहिवाशी आहेत. याप्रकरणी वडवणी पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

वडवणी तालुक्यातील उपळी येथील ३२ वर्षीय विवाहित महिलेनी स्व;ताच्या मोबाईलवरुन गावातील रहिवाशी मुंजा रतन वाघमारे असणाऱ्या ऊसतोड मुकादमाला फोन लावून म्हणाली कि, मला ऊसतोडणीची उचल पैसे पाहिजे आहे.तेव्हा मुंजा वाघमारे म्हणाला कि, ऊसतोडणीच्या उचलीचे पैसे पाहिजे असले तर वडवणी येथील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे ये असे सांगितल्यावर पिडित महिला याठिकाणी येऊन पुन्हा मुंजा वाघमारे याला फोन केला तेव्हा मुंजा वाघमारे फोनवरच म्हणाला कि, भगीरथी लाँजवर ये तेथे गेले आसता त्याठिकाणी गावातीलच दत्ता गायकवाड इसम होता तो मला म्हणाला कि तुझ्या मुलीला माझ्या जवळ ठेव व तुम्ही मुंजा वाघमारे यांच्याकडून पैसे घेऊन खाली या यांच्या सांगण्यावरुन मी भागिरथी लाँजच्या दुसऱ्या मजल्यावर गेले आसता रुममध्ये मुंजा रतन वाघमारे बसलेला होता.तेव्हा पिडित महिला म्हणाली कि, ऊसतोडणी उचलीचे पैसे द्या असे म्हणताच  मुंजा वाघमारे यांनी पीडिताच्या उजव्या हाताला वाईट हेतूने व मिठी मारत म्हणाला कि, तू आता ऊसतोडणीचे काम करु नकोस,तू माझे काम कर,तुला असेच पैसे देतो अस म्हणत जवळ घेतले तेव्हा पिडित महिलेनी विरोध केला आसता तोंड दाबून रुमचा दरवजा बंद करुन रुममध्ये बळजबरीने शाररिक संबध करुन बलात्कार केला व सदरील घडलेला प्रकार कोणाला सांगितलास तर तुला जिवे मारून टाकू अशी धमकी दिली असून याप्रकरणी पिडित ३२ वर्षीय विवाहित महिलेच्या फिर्यादीवरुन उपळी येथील ऊसतोड मुकादम मुंजा रतन वाघमारे यांच्या विरोधात वडवणी पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीला अटक केली आहे.तर याप्रकरणाचा तपास माजलगावचे एपीआय अविनाश अशोक राठोड हे करत आहेत.

Advertisement

Advertisement