गेवराई - तालुक्यातील राजापुर येथील रामदास अंबादास उबाळे (वय ४०) यांनी आज सकाळी विष प्राशन करून आत्महत्या केल्याची घटना घडली. मृतदेह जिल्हा रूग्णालयात शवविच्छेदनासाठी आणण्यात आला होता. रामदास उबाळे यांना ३ एकर जमिन असुन नापिकीमुळे बँकेचे व खाजगी कर्ज कसे फेडायचे ? या विवचनेतून त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलल्याचे नातेवाईकांनी सांगितले. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी असा परिवार आहे.
बातमी शेअर करा