पाटोदा दि.३(प्रतिनिधी): निरगुडीच्या बाजाराला दुचाकीवरून निघालेल्या व्यापाऱ्याला चारचाकीतून आलेल्या चोरांनी बळजबरी थांबवत बॅगमधील ६ लाख ८० हजार रुपये किमतीचे २० ग्रॅम सोने व तीन किलो चांदी असलेली बॅग हिसकावून पोबारा केल्याची घटना रविवार(दि.२)रोजी दुपारी साडेबारा वाजता घडली.
रविवारी हिवरसिंगा येथील सोन्या-चांदीचे व्यापारी सतीश उदावंत हे दुचाकीवरून निरगुडी, ता. पाटोदा येथे दुपारी साडेबारा वाजता बाजारात जात असताना खडकवाडी परिसरात चारचाकी वाहनातून आलेल्या चोरांनी त्यांची दुचाकी थांबवत दमदाटी केली. नंतर सराफा व्यापारी उदावंत यांच्या हातातील बॅग हिसकावली. त्यामुळे ते दुचाकीवरून खाली पडल्याने जखमी झाले. त्यांनतर चोर बॅग घेऊन पसार झाले. याप्रकरणी सतीश उदावंत यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
बातमी शेअर करा

