बीड दि.३(प्रतिनिधी):गेवराई तालुक्यातील मानसिंग तांडा येथील एका सराईत दुचाकी चोरट्याला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने जेरबंद करत त्याच्याकडून २ लाख ६० हजार रुपये किमतीच्या पाच दुचाक्या जप्त करण्यात आल्या असून चार चोरीचे गुन्हे उघडकीस आले आहेत.
स्थानिक गुन्हे शाखेचे पथक रविवार (दि.२) रोजी गेवराई उपविभागात चोरीच्या दुचाकींचा शोध घेत असताना जातेगाव रोड परिसरात एक चोरीची दुचाकी विक्रीसाठी आणल्याची खात्रीलायक माहिती मिळाली.त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून मच्छिद्र बबन राठोड रा. मानसिंग तांडा, ता. गेवराई याला ताब्यात घेतले. त्याच्याकडे असलेल्या दुचाकीचे कागदपत्रे विचारल्यानंतर त्याने ती चोरीची असल्याची कबुली दिली.अधिक चौकशीत त्याने आणखी चार चोरीच्या दुचाक्या लपवून ठेवल्याची माहिती दिली. त्यानुसार पोलिसांनी एकूण पाच दुचाक्या जप्त केल्या.असून गेवराई,चकलांबा तसेच छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील चिखलठाणा पोलीस ठाण्यात दाखल असलेले चार गुन्हे उघड झाले.सदरील कारवाई पोलीस अधीक्षक नवनीत काँवत, अपर पोलीस अधीक्षक समीर शेख आणि सहाय्यक पोलीस अधीक्षक व्यंकटरमन यांच्या मार्गदर्शनाखाली पोनि.शिवाजी बंटेवाड,पोउनि शेखर औटे,पोह.अशोक दुबाले,सोमनाथ गायकवाड,बाळू सानप,युनुस बागवान,आनंद मस्के,सिद्धेश्वर मांजरे यांनी केली.

