Advertisement

गुणरत्न सदावर्ते यांना मोठा झटका

प्रजापत्र | Tuesday, 28/03/2023
बातमी शेअर करा

मुंबई - वकील गुणरत्न सदावर्ते यांना मोठा झटका बसला आहे. गुणरत्न सदावर्ते यांची दोन वर्षांकरिता वकीलीची सनद रद्द करण्यात आली आहे. अ‍ॅड. सुशील मंचरकर यांनी गुणरत्न सदावर्ते यांच्याविरोधात तक्रार केली होती. त्यानंतर बार काऊंसिल ऑफ महाराष्ट्रने ही कारवाई करताना दोन वर्षांसाठी त्यांची वकीलीची सनद रद्द ठरवली आहे. त्यामुळे त्यांना आता वकीली करता येणार नाही दोन वर्षांची कारवाई केल्याची माहिती अ‍ॅड. मंचरकर यांना आणि बार काऊंसिल ऑफ इंडियालाही पत्राद्वारे कळविण्यात आले आहे.

Advertisement

Advertisement