बीड - पेठ बीड भागातील नागोबा गल्ली येथे किरकोळ कारणावरून दोन गटात तुफान हाणामारी व दगडफेक झाली. या प्रकरणी परस्पर विरोधात पेठ बीड पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, आरोपी निखील धारू, चिक्या कपुर, बंटी कपुर, राजेंद्रसिंग कनुर (सर्व रा.नागोबा गल्ली) बांनी गैरकायद्याची मंडळी जमवून संगनमत करत काहीही कारण नसतांना फिर्यादी ममता बहोत यांच्या घरावर दगडफेक करत त्यांच्या सासू विमलबाई बहोत यांना दगडाने मारहाण केली. तसेच राग बहोत यांच्या डोक्याला दगड मारला. आरोपींनी फिर्यादीची मोटार सायकल क्रमांक (एम.एच.२३सी.बी. ३९२२) व स्कुटी क्र.(एम.एच.२३.बी.ई.५६४५) या वाहनांचे नुकसान केले. तसेच घरातील लोकांना लाथा- बुक्याने मारहाण केल्या प्रकरणी गुन्हा नोंद करण्यात आला फिर्यादी जिग्नेश राजेंद्रसिंग कसुर यांच्या फिर्यादीवरून आरोपी रबि बहोत, अनिल बहोत, विशाल बहोत, राहुल बहोत, राज रवि या आरोपीविरोधात मारहाण करत घरावर दगडफेक करत टि.व्ही.चे नुकसान केल्याप्रकरणी गुन्हा नोंद करण्यात आला असुन दोन्ही गुन्ह्याचा तपास पोह राठोड हे करीत आहेत.