Advertisement

कुंदन काळे सोलापुर शहर व ग्रामिण निरीक्षकपदी

प्रजापत्र | Sunday, 19/03/2023
बातमी शेअर करा

बीड दि.१९ (प्रतिनिधी)-राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस महाराष्ट्र राज्य प्रदेश संघटक तथा बीडचे भूमिपुत्र कुंदन काळे यांना पक्षाने आता नवी जबाबदारी दिली आहे. त्यांचे पूर्वीचे काम पाहून पक्षाने  त्यांना दुसरी जबाबदारी दिली असून त्यांच्याकडे आता राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस सोलापूर शहर आणि ग्रामीण निरीक्षक पद देण्यात आले आहे. युवा नेते कुंदन काळे यांच्या या निवडीबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

 

       युवा नेते कुंदन काळे हे गेल्या अनेक वर्षापासून राष्ट्रवादी पक्षामध्ये प्रामाणिक कार्यकर्ता म्हणून काम पाहत आहे त्यांच्या याच कामावर खुश होत पक्षाने त्यांना राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस महाराष्ट्र राज्य प्रदेश संघटक म्हणून नियुक्त केले होते. त्यांनी या पदावर काम करताना पक्ष बांधण्यासाठी मोठे कार्य करत अनेक गरजूंना मदत करण्याचे काम केलं. यासह इतरही काम करत पक्षांमध्ये एक त्यांची स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे. त्यांच्या याच कामामुळे पक्षाने त्यांना एक नवी जबाबदारी देत सोलापूर शहर आणि ग्रामीण निरीक्षक पद दिले आहे. याही ठिकाणी ते चांगलं काम करत सर्वसामान्यांना न्याय व पक्ष मजबूतीसाठी काम करतील.  पक्षांने जे पद दिले आहे त्या पदाला मी योग्य न्याय देईल अशी मत कुंदन काळे यांनी व्यक्त केल. कुंदन काळे यांच्या या निवडीबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.
 

Advertisement

Advertisement