बीड - जुनी पेन्शन लागू करावी या व इतर मागण्यांसाठी गुरूवारी ४३ कर्मचारी संघटनांच्या समन्वय समितीच्या नेतृत्वात जिल्हाधिकारी कार्यालयावर विक्रमी मोर्चा काढण्यात आला.
सिद्धी विनायक कॉम्पलेक्स परिसरात सकाळी दहा वाजेपासून जिल्हाभरातील शासकीय निमशासकीय कर्मचारी मोठ्या संख्येने एकत्र आले. तेथून निघालेल्या विशाल मोर्चात महिलांसह पुरूष कर्मचाऱ्यांची संख्या उल्लेखनीय होती. एकच मिशन जुनी पेन्शन या घोषणेने माेर्चा मार्गावरील परिसर दुमदुमत होता. मोर्चा पुढे मार्गस्थ झाल्यानंतर सुभाष रोड, भाजी मार्केट कॉर्नर, सहयोग नगर, स्वामी समर्थ मंदिर परिसरात वाहतुकीची कोंडी झाली होती.
बातमी शेअर करा