दिल्ली - महाराष्ट्रात सरकारी कर्मचारी संपावर जात आहेत. शेतकरी लाँग मार्च घेऊन मुंबईत धडकत आहेत, याचा अर्थ महाराष्ट्र खदखदतोय असं वक्तव्य शिवसेना (ठाकरे गट) खासदार संजय राऊत यांनी केलं. जनतेच्या मनातील सरकार आम्ही सत्तेवर आणलं असे म्हणत होते. पण जनतेच्या मनातील सरकार असते तर जनता रस्त्यावर उतरली नसती असा टोलाही राऊतांनी लगावला. हे सरकार शेतकरी, कष्टकऱ्यांच्या विरोधातील असल्याचे राऊत म्हणाले. ते दिल्लीत प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
बातमी शेअर करा