Advertisement

विद्यार्थ्यांना घेवून जाणाऱ्या स्कूलबसवर दगडफेक

प्रजापत्र | Thursday, 09/03/2023
बातमी शेअर करा

गेवराई दि. ९ ( प्रतिनिधी ) - शाळा सुटल्यानंतर विद्याथ्यांना घेऊन जात असताना शहरातील मेनरोडवरील रेणुकामाता मंदिराजवळ इरा स्कूलच्या बसवर भर रस्त्यात स्कूलबस अडवून दगडफेक करत काचा फोडल्याची घटना घडली. या घटनेमुळे स्कूल बसमध्ये बसलेले विद्यार्थी भयभीत होऊन रडत होते. दरम्यान घटनास्थळाकडे लोकांनी धाव घेतल्यानंतर हल्ला करणारे पळून गेले तसेच स्कुलबस चालकही पळून गेला. यामुळे शहरामध्ये गुंडगिरी वाढल्याची चर्चा नागरिकांमधून केली जात आहे.

 

न्यू ईरा इंग्लिश स्कुलची मिनी स्कुलबस शाळा सिद्धी सुटल्यानंतर विद्यार्थ्यांना घरी सोडण्यासाठी निघाली होती. गुरुवारी दुपारी २ वाजण्याच्या दरम्यान सदर स्कुलबस काही जणांनी अडवून काचांवर दगडफेक केली. हा प्रकार पाहिल्यानंतर स्कुलबसमध्ये असलेले विद्यार्थी भयभीत होवून रडत होते. विद्यार्थ्यांच्या रडण्याचा आवाज ऐकल्यानंतर आजूबाजूच्या लोकांनी स्कूलबसकडे धाव घेतल्यानंतर हल्ला करणारे पळून गेले. हा हल्ला कोणी केला, कशासाठी केला हे समजले नसले तरी देखील घडलेला प्रकारामुळे गेवराई शहरात गुंडगिरी वाढत असल्याच्या चर्चा होवू लागल्या असून पोलिस अधिक्षक नंदकुमार ठाकुर यांनी गेवराई ठाणे प्रमुखांना सूचना देवून गुंडगिरींना आळा घालावा, अशी मागणी जनतेतून होत आहे.

Advertisement

Advertisement