Advertisement

आज पॉझिटिव्ह अर्धशतक पार तर शिक्षकांची वाटचाल शतकाकडे

प्रजापत्र | Saturday, 28/11/2020
बातमी शेअर करा

बीड-जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या धिम्या गतीने वाढू लागली असून शनिवारी (दि.२८) जिल्ह्यात ६० पॉझिटिव्ह रुग्ण आढळले.तर शिक्षकांची वाटचाल शतकाकडे जाऊ लागली असून आतपर्यंत ८९ शिक्षकांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले. 
             शनिवारी (दि.२८) आरोग्य विभागाच्या अहवालात ११६० अहवालात ६० पॉझिटिव्ह तर ११०० निगेटिव्ह आले असून पॉझिटीमध्ये अंबाजोगाई १२,आष्टी ५,बीड २०,गेवराई २,केज ३,;माजलगाव ३,परळी ९,शिरूर १ आणि वडवणीत ५ रुग्ण सापडले.तर शिक्षकांच्या कोरोना तपासणीत अंबाजोगाई १५,आष्टी १०,बीड १६,धारूर २,गेवराई १३,केज ११,माजलगाव १,परळी ११,पाटोदा ४,शिरूर ५,आणि वडवणीत १ शिक्षकाला कोरोना झाल्याचे समोर आले आहे.८४९२ तपासण्यांमध्ये ८९ शिक्षक पॉझिटिव्ह आले असून ६१६ जणांचे अहवाल प्रलंबित आहेत. 

 

Advertisement

Advertisement