गेवराई-एक मार्चपासून गॅसच्या दरामध्ये पन्नास रुपयांची वाढ करण्यात आली. याचा निषेध गेवराईमध्ये बीड जिल्हा युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अँड श्रीनिवास बेदरे यांच्यावतीने गॅस टाकीवर नागरिकांना बसवून पेढे वाटून निषेध व्यक्त करण्यात आला. यावेळी केंद्र सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली. यावेळी जिल्हाध्यक्ष अँड श्रीनिवास बेदरे, तालुकाध्यक्ष किरण अजबकर, बाळासाहेब हिंगे, प्रशांत शेलार, शेख अल्ताफ, फैसल चाऊस यांची उपस्थिती होती.
बातमी शेअर करा