Advertisement

दुसऱ्या पसंतीचा मेळ बसविण्याचे उमेदवारांसमोर आव्हान

प्रजापत्र | Friday, 27/11/2020
बातमी शेअर करा

बीड  : विधान परिषदेच्रा औरंगाबाद विभाग पदवीधर मतदारसंघातील निवडणुकीत मोठ्या प्रमाणावर चुरस निर्माण झाली असून उमेदवाराला विजयासाठी  दुसऱ्या  पसंतीचा मेळ बसवावा लागणार आहे. दुसरी पसंती जमविण्यात  कोण किती यशस्वी  ठरतो यावर  अनेक समीकरणे ठरणार आहेत.
पदवीधर मतदारसंघात नेहमीच दुसऱ्या पसंतीची मते महत्वाची ठरलेली आहेत. यावेळीही  प्रमुख उमेदवार दुसऱ्या पसंतीच्या  मतांची फिल्डिंग लावण्याच्या  कामाला लागले आहेत. रा निवडणुकीत राष्ट्रवादीकडून आ. सतीश चव्हाण, भाजपकडून शिरीष बोराळकर, तर अपक्ष रमेश पोकळे यांच्यासह  सचिन ढवळे आदी उमेदवारांनी आव्हान निर्माण केले आहे. त्यामुळे  ही निवडणूक सुरुवातीला अपेक्षिली जात होती तशी एकतर्फी असणार नाही. म्हणूनच यावेळी  रा मतदारसंघात कोणाला पहिल्या  पसंतीच्या मतांवर विजय मिळवता येईल असे चित्र आज तरी दिसत नाही. 4 उमेदवार थेट स्पर्धेत असल्राने रावेळी लढत देखील काट्याची असेल, म्हणूनच दुसर्‍रा पसंतीच्रा मताला रावेळी महत्व असणार आहे. हे लक्षात घेऊनच प्रमुख उमेदवारांनी आता इतर उमेदवारांच्रा दुसऱ्या  पसंतीवर लक्ष देणे सुरु केले आहे. पुढच्रा 2 दिवसात ही फिल्डिंग आणखी टाईट होणे अपेक्षित आहे.

कशी मोजतात दुसरी पसंती?
या  निवडणुकीत जेवढे मतदान होते, त्याच्या  अर्ध्रापेक्षा 1 अधिक असा कोटा विजयासाठी  निश्‍चित केला जातो. त्यानुसार  अगोदर सर्व उमेदवारांची पहिल्या पसंतीची मते मोजली जातात . त्यात  कोणालाही कोटा पूर्ण करता आला नाही तर शेवटच्या  स्थानावर असलेल्या  उमेदवारांच्या  मतपत्रिकांमध्रे दुसऱ्या पसंतीची मते कोणाला आहेत हे मोजले जाते , आणि ती ज्यांची  नावे असतील त्यांच्या  मूळ मतांमध्रे मिळवली जातात . त्यानंतरही  कोणीच कोटा पूर्ण करीत नसेल तर मग पुन्हा शेतीच्या  दुसऱ्या  स्थानावर असलेल्या  उमेदवाराची दुसऱ्या पसंतीची मते मोजली जातात . अशा पद्धतीने शेवटच्रा स्थानावरून एकेक उमेदवाराची दुसऱ्या पसंतीची  मते मोजत जो पर्रंत कोणीच कोटा पूर्ण करीत नाही तो पर्रंत प्रक्रिया  राबविली जाते. म्हणूनच आता प्रमुख उमेदवार नेमकी कोणाची दुसऱ्या पसंतीची मते मोजली जाऊ शकतात याचा  अंदाज बांधून त्यांना  दुसऱ्या पसंतीच्या  मताची ’मागणी ’ करण्याची  फिल्डिंग लावताना दिसत आहेत. तर काहींनी आपल्या  हक्काच्रा मतदारांना केवळ पहिली पसंतीचा द्या दुसरी पसंती देऊच नका असे सांगायला  देखील सुरुवात केली आहे.

 

Advertisement

Advertisement