बीड-बीडच्या जिल्हा शल्य चिकित्सकपदी डॉ.सूर्यकांत गित्ते यांची नियुक्ती करण्यात आली आहे. विद्यमान जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अशोक थोरात यांना अद्याप नियुक्ती देण्यात आलेली नाही, मात्र त्यांची नियुक्ती लातूर विभागाचे उपसंचालक म्हणून होणार असल्याची सूत्रांची माहिती आहे.
बीडचे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अशोक थोरात यांचा बीड जिल्ह्यातील कालावधी पूर्ण झाल्याने त्यांच्या बदलीची चर्चा अनेक दिवसांपासून होती. त्यांच्या जागेवर डॉ. सूर्यकांत गित्ते यांची नियुक्ती देखील चर्चेत होती, मात्र त्याचे आदेश निघत नव्हते. अखेर गुरुवारी उशिरा राज्य शासनाने डॉ. सूर्यकांत गित्ते यांच्या बीडचे जिल्हा शल्य चिकित्सक म्हणून नियुक्तीचे आदेश काढले. डॉ. अशोक थोरात यांची बीड जिल्ह्यातील कारकीर्द आव्हानात्मक आणि तितकीच आश्वासक राहिलं. कोरोनाच्या संसर्ग काळात त्यांची भूमिका,समन्वय महत्वाचा राहिला. मागच्या तीन वर्षात जिल्हा रुग्णालयाला लोकाभिमुख बनवण्याचा प्रयत्न डॉ. अशोक थोरात यांनी केला होता,आता ते टिकविण्याचे जाणीव वाढविण्याचे आव्हान नूतन जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सूर्यकांत गित्ते यांच्यासमोर असणार आहे.
डॉ. सूर्यकांत गित्ते हे देखील बीड जिल्ह्यातीलच असून त्यांची संपूर्ण बीड जिल्ह्यात ओळख आहे. त्यांनी यापूर्वी पाटोदा, नेकनूर आदी ठिकाणी काम पहिले आहे. तसेच ते बीडच्या जिल्हा रुग्णालयात देखील कार्यरत होते. त्यामुळे नवीन जबादारी देखील त्यांच्यासाठी फारशी अवघड असणार नाही.
---------------------------------------------------------
बातमी शेअर करा