Advertisement

भाजलेल्या अवस्थेत असलेल्या इसमावर उपचार सुरु

प्रजापत्र | Monday, 20/02/2023
बातमी शेअर करा

केज  – शहरातील केज बीड रोडवर शिक्षक कॉलनी च्या समोरच्या बाजूला सकाळी साडेदहाच्या सुमारास एक इसम अर्धवट जळालेल्या अवस्थेत आढळून आला. सदरील घटनेची माहिती मिळताच उपजिल्हा रुग्णालयाचे डॉक्टर सचिन सूर्यवंशी व रुग्णवाहिकेचे पायलट उमेश हंगे यांनी तात्काळ त्या ठिकाणी धाव घेऊन सदरील जखमी अवस्थेत असलेल्या इसमास अंबेजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ महाविद्यालयात उपचारार्थ दाखल केले आहे.

 

          सदरील घटना नेमकी कोणत्या कारणातून घडली हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. मात्र कळंब शहरातील मोहेकर कॉलेजमध्ये लॅब असिस्टंट म्हणून कार्यरत असलेले व तिथेच दत्तनगर भागात राहत असलेले श्याम काळे हे केज येथे शिक्षक कॉलनी च्या समोरच्या बाजूला रोडवर जळालेल्या अवस्थेत आढळून आले. सदरील घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलीसही त्या ठिकाणी दाखल झाले आणि रुग्णवाहिकेच्या माध्यमातून त्यांना आंबेजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ हॉस्पिटल मध्ये दाखल केले आहे.
 

Advertisement

Advertisement