Advertisement

शिक्षकाची गळफास घेवून आत्महत्या

प्रजापत्र | Saturday, 18/02/2023
बातमी शेअर करा

बीड - एका ५५ वर्षीय सहशिक्षकाने आपल्या राहत्या घरी खिडकीला गळफास घेवून आत्महत्या केल्याची घटना शहरातील पिंगळे नगरमध्ये आज सकाळी उघडकीस आली. दरम्यान घटनेची माहिती कळताच शिवाजीनगर ठाण्याचे पोलिस घटनास्थळी दाखल झाले होते. मिळालेल्या माहितीनुसार बीड शहरातील पिंगळे नगर येथील पांडूरंग भुतपले (वय ५५) हे चंपावती शाळेत सहशिक्षक म्हणून कार्यरत होते. शुक्रवारी रात्री त्यांनी कुटुंबियांसमवेत जेवणे केले. त्यानंतर त्यांचे कुटुंबीय झोपी गेले. शनिवारी पहाटे शिक्षक भुतपले यांनी घराच्या खिडकीला गळफास घेवून आत्महत्या केली. दरम्यान घटनेची माहिती मिळताच शिवाजीनगर पोलिस ठाण्याचे पो.ह. एस. एम. राठोड यांनी घटनास्थळी जावून पंचनामा केला. याप्रकरणी शिवाजीनगर पोलिस ठाण्यात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास पो. अंमलदार भागवत घोडके करित आहेत.

Advertisement

Advertisement