तलवाड़ा - तालुक्यातील तलवाड़ा पोलीस स्टेशन हद्दितील मिरगाव येथील रिवाइंडिंग दुकानात रिपेयरिंगला आलेले पाण बुडी मोटर सह साहीत्य चोरी गेल्याची तक्रार तलवाड़ा पोलीस
स्टेशन येथे अन्नासाहेब प्रह्लाद गोडबोले ,यांच्या फिर्यादीवरून अज्ञात चोराच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता.
तलवाडा पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक शंकर वाघमोडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोना,आंधळे यांच्याकडे तपास देण्यात आला होता. पोलीस कर्मचारी आंधळे, पोह अलगट, पोह बागलाने यांनी तपासाचा चक्र जलद गतीने सुरू केला अवघ्या चोवीस तासात चोरी गेलेली मोटरसह साहित्य व आरोपी भरत निवृत्ती उमाप वय वर्ष ३५ रा मिरगाव यास ताब्यात घेण्यात आले आहे. या कामगिरीचे सर्वत्र परीसरातून कौतूक होत आहे.
बातमी शेअर करा