बीड - रोजंदारीमजदुर सेनेच्या नेतृत्वाखाली नगर पालिका, नगर पंचायत कामगारांनी आज दुपारी छत्रपती शिवाजी महाराज चौक परिसरात रास्ता रोको आंदोलन करण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलीसांनी त्यांना रोखले आणि ताब्यात घेवुन थेट शिवाजीनगर ठाण्यात नेले. त्याठिकाणीही आंदोलकांनी आक्रमक भुमिका घेत ठिय्या मांडला. त्यानंतर पोलीसांनी त्यांना सोडून देताच सर्व आंदोलकांनी थेट जिल्हाधिकारी कार्यालय गाठले आणि त्याठिकाणी शिवाजीनगर पोलीसांच्या विरोधात घोषणाबाजी केली. यावेळी शिवाजीनगर ठाण्याचे एपीआय लोंढे यांनी धक्काबुक्की केल्याचा आरोप करत त्यांच्यावर तात्काळ कारवाई करावी अशी मागणी आंदोलकांनी केली.
बातमी शेअर करा