बीड - मोटारसायकलला कट मारल्याने मोटारसायकल स्वाराच्या नातेवाईकांनी बस थांबवुन बस चालकाला मारहाण केली. या प्रकारामुळे बसचालक गाडी रोडवर सोडुन दुपारी ग्रामीण ठाण्यात तक्रार देण्यासाठी दाखल झाले. मात्र रोडवर उभ्या असलेल्या त्यास बसवर मोटारसायकल आदळल्याने एका विद्यार्थ्याचा मृत्यू झाल्याची घटना काल सायंकाळी शिवाजीनगर हद्दीतील पांगरी रोडच्या पुलाजवळ घडली. दरम्यान बस चालकाने गाडी रोडवर उभी केली नसती तर हा अपघात घडला नसता अशा प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत. बीडकडून सिरसपारगाव कडे जाणारी बस एम.एच.20 बी.एल.2343 काल दुपारी पांगरीरोड पासुन जात असतांना एका मोटारसायकलला गाडीचा कट लागला. त्यावेळी मोटारसायकल स्वाराच्या नातेवाईकांनी गाडी थांबवुन बस चालकाला मारहाण केली. यामुळे बस चालक गाडी रोडवरच सोडून थेट बीड ग्रामीण पोलीस ठाण्यात तक्रार देण्यासाठी दाखल झाले. मात्र सायंकाळी पांगरी रोड जवळील पुलाजवळ त्याच उभ्या असलेल्या बसवर मोटारसायकल आदळल्याने भिषण अपघात झाला. यामध्ये अमोल प्रकाश मुंडे (वय 18, रा.दहिफळ वडमाऊली ता.केज) याचा जागीच मृत्यू झाला. मयत अमोल मुंडे हा बीड येथे शिक्षणासाठी राहत होता. या दुर्देवी घटनेत त्याचा मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त होत आहे
बातमी शेअर करा