Advertisement

केज तालुक्यात महिलेचा दगडाने ठेचून खून

प्रजापत्र | Wednesday, 25/11/2020
बातमी शेअर करा

घटनास्थळी पोलिस उपअधिक्षक दाखल

बीड: वडिलांच्या घराकडे जात असताना एका ४२ वर्षीय महिलेचा दगडाने ठेचून खून केल्याचा खळबळजणक प्रकार आज दुपारी तालुक्यातील हादगाव डोका येथे घडला. घटनेची माहिती पोलिसांना मिळताच त्यांनी त्या ठिकाणी धाव घेवून पंचनामा केला.
            सांगली येथे आपल्या कुटुंबासोबत राहणारी मीरा बाबुराव रंधवे ही महिला तिची आत्या गांधारी इनकर हिच्या वर्ष श्रद्धासाठी डोका येथे आली होती. तीने दि. २४ रोजी अभिजीत ड्रेसेस मधून कपडे खरेदी करून रात्री सुमारे ९:३० वा. च्या दरम्यान डोका येथील गावच्या पश्चिम दिशेने वाहणाऱ्या बोभाटी नदी शेजारील  शेतातील भांगे-इनकर वस्ती वरील  वडिलांच्या घराकडे जात असताना रस्त्यात तिचा अज्ञात व्यक्तीने डोक्यात दगड घालून खून केला. तिचा पूर्ण चेहरा व डोक्याची कवटी दगडाने चेंदामेंदा केली आहे. घटनास्थळावर पोलीस निरीक्षक प्रदीप त्रिभुवन, पोलीस उपनिरीक्षक श्रीराम काळे, अशोक नामदास, पोलिस जमादार अमोल गायकवाड, उपविभागीय पोलिस अधिकारी कार्यालय केजचे राऊत, अहंकारे तपासणी पथक घटनास्थळी दाखल झाले आहे. मयत महिलेच्या अंगावर लाल गुलाबी रंगाची साडी व गडद निळ्या रंगाचे ब्लाउज असून पायात चपला आहे. प्रेता जवळ दोन पिशव्या पडलेले असून शेजारी दगड पडलेला आहे. हा खून एवढा भयानक पद्ध्तीने केलेला आहे की, तिचा चेहरा ओळखू येऊ नये म्हणून पूर्ण चेंदामेंदा केला आहे तिची पूर्ण कवटी फुटून आतील मेंदू आणि दात व अवशेष पडलेले आहेत. पुढील तपास पोलीस करत आहेत.  

Advertisement

Advertisement