चाकण--खेड तालुक्यातील कन्या विद्यालय चाकण येथील सहशिक्षिका आशा रामनाथ तांदळे( ढाकणे ) मॅडम यांना पुणे जिल्हा कलाशिक्षक संघाच्या वतीने दिला जाणारा जिल्हा गुणवंत कलाशिक्षक पुरस्कार जाहीर झाला आहे. याबद्दल त्यांचे सर्वस्तरातून अभिनंदन करण्यात येत आहे. पुणे जिल्हा कलाशिक्षक संघाच्या वतीने दरवर्षी उत्कृष्ट कार्य करणाऱ्यांचा गौरव करण्यात येतो. यावेळी हा पुरस्कार आशा ढाकणे यांना जाहीर झाला असून याबद्दल त्यांचे सर्वस्तरातून अभिनंदन करण्यात येत आहे. दरम्यान आशा ढाकणे वंजारी ओबीसी विकास महासंघाचे राष्ट्रीय संपर्कप्रमुख व बा. मा. पवार माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय बिरदवडी चाकण चे श्री दादासाहेब ढाकणे सर यांच्या पत्नी आहेत.
बातमी शेअर करा