Advertisement

किरकोळ वादातून आई-लेकाला बेदम मारहाण

प्रजापत्र | Thursday, 09/02/2023
बातमी शेअर करा

बीड  - किरकोळ कारणावरून आई-लेकाला बेदम मारहाण केल्याची घटना (दि.७) रोजी शहरातील चंपावती नगर भागात घडली. याप्रकरणी आरोपीविरुद्ध शहर पोलीस ठाण्यात आरोपीविरुद्ध अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांकडून मिळाली माहिती अशी की , कृष्णा शिशिकांत भंडारे वय 20 वर्ष व्यवसाय शिक्षण  राहणारा चंपावती नगर,बीड  असुन मी आई, वडील, भाऊ यांच्या सोबत राहुण माझ डिप्लोमा कोर्स करत आहे. (दि. ७) रोजी ३.०० वा. मी माझ्या घरातील कचरा टाकण्यासाठी घरा बाहेर आलो असता राहुल क्षिरसागर रा. चंपावती नगर,बीड नावाचा मुलगा तु कचरा टाकण्यासाठी घराच्या बाहेर का आला असे म्हणुन त्यांनी मला लाथा बुक्यानी मारण्यास सुरवात केली.  नंतर माझी आई नामे शारदा शिशिकांत भंडारे हि आमचा आवाज एकुण आमचे भाडण सोडवण्यासाठी बाहेर आली त्यावेळी त्यांनी माझ्या आईला पण लाथाबुक्यानी मारहाण केली व शिवीगाळ करुन जिवे मारण्याची धमकी दिली असे या फिर्यादीत म्हंटले आहे.
या प्रकरणी आरोपी राहुल क्षीरसागर याच्याविरुद्ध शहर पोलीस ठाण्यात अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे.व पुढील तपास पोलीस निरीक्षक सानप करीत आहे . 

Advertisement

Advertisement