खेड-कन्या विद्यालय चाकण ता. खेड जि. पुणे सहशिक्षिका श्रीमती तांदळे आशा रामनाथ/ढाकणे यांची शिवछत्रपती खेड तालुका माध्यमिक शिक्षक सेवक पतसंस्था चाकण च्या स्वीकृत संचालक पदी बिनविरोध निवड झाल्याबद्दल विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सौ. पिंगळे मॅडम व सर्व शिक्षिका वृंद व शिक्षकेतर कर्मचारी या सर्वांच्या वतीने आज विद्यालयामध्ये सन्मान करण्यात आला
हातगाव ता. शेवगाव जि. अहमदनगर च्या मूळ रहिवासी असणाऱ्या स्वीकृत संचालक सौ. आशा रामनाथ तांदळे मॅडम या हातगाव मधील श्री दादासाहेब ढाकणे सर राष्ट्रीय संपर्कप्रमुख वंजारी विकास ओबीसी महासंघ भारत यांच्या कर्तबगार धर्मपत्नी असून त्यांनी आपल्या शैक्षणिक कार्याचा ठसा नॅशनल एक्सलन्स अवॉर्ड2019 हा पुरस्कार मिळून निर्माण केला होता आत्ता सहकार व सामाजिक क्षेत्रात त्यांच्या कार्याचा विचार करून विद्यालयाने त्यांची शिवछत्रपती खेड तालुका शिक्षक सेवक पतसंस्थेच्या स्वीकृत संचालक पदी बिनविरोध निवड केल्यामुळे हातगाव चे नाव महाराष्ट्राच्या औद्योगिक नगरी चाकण मध्ये निर्माण केले आहे यामुळे सर्व मित्र परिवार नातलग व समाजाच्या सर्व स्तरातून त्यांचे अभिनंदन व कौतुक होत आहे...