बीड-नवी दिल्ली आणि मुंबईत मागील चार पाच दिवसांपासून कोरोनाग्रस्तांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढू लागली असून कोरोनाची दुसरी लाट महाराष्ट्रात येण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.मात्र असे असताना रविवारी बीड जिल्ह्यातील तीन तालुक्यात कोरोना शून्यावर आला.वडवणी,गेवराई आणि केज वगळता इतर तालुक्यात मात्र पॉझिटिव्ह रुग्ण सापडले आहेत.
आरोग्य विभागाच्या अहवालात ६२ जण पॉझिटिव्ह आले असून यात अंबाजोगाई १५,आष्टी १९,बीड ११,धारूर ४,माजलगाव २,परळी ५ ,पाटोदा १ आणि शिरूरमधील ५ जणांचा समावेश आहे.तर १७५७ जणांचा अहवाल निगेटिव्ह आला आहेत.महत्वाचे म्हणजे प्रथमच एवढ्या प्रमाणावर तपासणी केल्या असता पॉझिटिव्ह रुग्णांचे प्रमाण घसरले असल्याचे पाहायला मिळाले.
बातमी शेअर करा