लंडन-आयपीएलचे माजी अध्यक्ष ललित मोदी यांना कोरोनं झाला असून त्यांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती समोर येत आहे. मागच्या ७ दिवसांपासून ते ऑक्सिजनवर असल्याचे सांगितले जात आहे.ललित मोदी यांनी यासंदर्भातली एक पोस्टही शेअर केली आहे. त्यात ललित मोदी यांनी म्हटलं आहे की त्यांना दोन आठवड्यात दोनवेळा कोरोनाची बाधा झाली. तसंच निमोनियानेही मला ग्रासलं आहे असंही त्यांनी म्हटलं आहे.
इंस्टाग्राम पोस्टमध्ये ललित मोदी म्हणाले की,मला मागच्या दोन आठवड्यात दोनदा कोरोना झाला. त्यानंतर निमोनियाही झाला. तीन आठवड्यांपासून मी विलीगीकरणात आहे. एअर अँब्युलन्सने मला लंडनला आणण्यात आलं. माझे डॉक्टर माझ्यावर व्यवस्थित उपचार करत आहेत असंही त्यांनी म्हटलं आहे. मी मागच्या सात दिवसांपासून दिवसाचे २४ तास ऑक्सिजन सपोर्टवर आहे. मी माझ्या डॉक्टरांचा आणि मुलांचा तसंच सगळ्यांचा आभारी आहे असे ते म्हणाले.
बातमी शेअर करा