बीड-जिल्ह्यात मागील एक महिन्यापासून कोरोना संसर्ग मोठ्या प्रमाणावर घटल्याचे चित्र असून रविवारी (दि.१५) बीड जिल्ह्यात कोरोनाने निचांकी पातळी गाठली.दुपारी आलेल्या आरोग्य विभागाच्या अहवालात ५२ जण पॉझिटिव्ह आले असून २९८ जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत.
बीड जिल्ह्यात कोरोनाचे लोण ग्रामीण भागात पसरू लागल्यानंतर भीषण परिस्थिती निर्माण होईल असे चित्र आहे.सध्या बाधितांच्या तपासण्याही कमी करण्यात येत असल्याने पॉझिटिव्ह रुग्णांचे प्रमाण घटू लागले आहे.रविवारी पॉझिटिव्हमध्ये अंबाजोगाई -५,आष्टी -५,बीड -१६,धारूर -१,गेवराई -५,केज -१,माजलगाव -११,परळी -६,पाटोदा -१,शिरूर -१ असा अहवाल आहे.
बातमी शेअर करा