Advertisement

पंढरपूर मंदिरात दररोज 1 हजार भाविकांना प्रवेश,ऑनलाईन बुकिंग असेल तरच मिळणार विठ्ठलाचं दर्शन

प्रजापत्र | Sunday, 15/11/2020
बातमी शेअर करा

पंढरपूर : येत्या सोमवारी म्हणजेच पाडव्यापासून राज्यातील मंदिरं उघडण्यास सरकारने परवानगी दिली आहे. ठाकरे सरकारच्या या दिवाळी गिफ्टमुळे भक्तांमध्ये मोठं आनंदाचं वातावरण आहे. पण मंदिरं खुली करताना प्रत्येक नियमांचं पालन करणं आवश्यक आहे. याचं सरकारच्या गाडलाइन्स लक्षात घेत पंढरपूर मंदिरही आता भाविकांसाठी खुलं होणार आहे. त्यामुळे विठ्ठल भक्तांमध्ये उत्साह पसरला आहे.
                             मिळालेल्या माहितीनुसार, श्री विठ्ठल रुक्मिणीमातेच्या दर्शनासाठी ऑनलाईन बुकींग करावी लागणार आहे. पंढरपूरात दररोज एक हजार भाविकांना दर्शन दिलं जाणार असल्याचं सांगण्यात आलं आहे. यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे 65 वर्षावरील आणि 10 वर्षापर्यंतच्या मुलांना दर्शनास बंदी घालण्यात आली आहे. नित्योपचाराचा वेळ वगळता उरलेल्या वेळात दर एक तासाला शंभर लोकांना मंदिरात दर्शनासाठी प्रवास देण्यात येईल असा निर्यम मंदिर प्रशानसनाकडून घेण्यात आला आहे

Advertisement

Advertisement