Advertisement

दोन दिवसांच्या विश्रांतीनंतर भारत जोडो यात्रा सुरू

प्रजापत्र | Wednesday, 23/11/2022
बातमी शेअर करा

काँग्रेस खासदार राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा आज दोन दिवसांच्या विश्रांतीनंतर मध्यप्रदेशातून सुरू झाली आहे. ही यात्रा महाराष्ट्रातील जळगाव जामोद येथून सकाळी 6 वाजता निघून बुऱ्हानपूर जिल्ह्यातील बोदर्ली गावात सकाळी 7 वाजता पोहोचली. गाडीतून खाली उतरताच राहुलचे जंगी स्वागत करण्यात आले. राहुल गांधी यांचे महिलांनी औक्षण केले.

 

 

त्यांच्या स्वागतासाठी बंजारा लोकनृत्य कलाकार रीना नरेंद्र पवार यांनी सादर केले. राहुल यांनी 11 मिनिटांचे भाषण केले. तत्पूर्वी, माजी मुख्यमंत्री आणि प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष कमलनाथ म्हणाले की, या यात्रेला मध्यप्रदेशात जास्तीत जास्त जनतेचा पाठिंबा मिळणार आहे.

 

 

राहुल गांधी यांची यात्रा सकाळी 10 वाजता बुऱ्हानपूर येथील सेंट झेवियर्स शाळेत पोहोचेल. यादरम्यान राहुल गांधी 7 किमी चालणार आहेत. बुरहानपूरपासून यात्रा 10 किमी अंतरावर आहे. बुरहानपूर येथे दुपारी 4 वाजता प्रवास पुन्हा सुरू होईल. सायंकाळी 7 वाजता परिवहन नगर येथे सभा होणार आहे. बैठकीनंतर राहुल गांधी झिरीमध्ये रात्रीचा मुक्काम करणार आहेत.
 

Advertisement

Advertisement