Advertisement

एकाच घरात आढळले चार मृतदेह

प्रजापत्र | Wednesday, 23/11/2022
बातमी शेअर करा

 श्रद्धा वालकर हत्याकांडाचा (Shraddha Murder Case) खुलासा झाल्यानंतर देशाच्या राजधानीचं शहर असणारी दिल्ली (Delhi Crime) हादरली. घटनेच्या तपासात एकापाठोपाठ उलगडणाऱ्या गोष्टींनी थरकाप उडवून दिला. अशातच आता दिल्ली पुन्हा एकदा हादरली आहे. दिल्लीतील दक्षिण पश्चिम जिल्ह्यातील पालम भागात एकाच घरात पोलिसांना चार जणांचे मृतदेह आढळून आले आहेत. प्राथमिक माहितीनुसार, एका मुलानं आपले आई-वडील, बहीण आणि आजीची हत्या केल्याचं बोललं जात आहे. मंगळवारी रात्री साधारण साडेदहा वाजताच्या सुमारात पोलिसांना या घटनेसंदर्भात माहिती मिळाली. मिळालेल्या माहितीनुसार, चौघांचीही चाकूनं वार करून हत्या करण्यात आली आहे.

 

 

आरोपी मुलगा व्यसनाधीन असून तो सतत अमंली पदार्थांचं व्यसन करायचा. तसेच, नुकताच तो व्यसनमुक्ती केंद्रातून बाहेर पडला असल्याचीही माहिती मिळत आहे. पोलिसांनी आरोपी मुलाची ओळख पटवली आहे. केशव असं आरोपीचं नाव असून त्याचं वय 25 वर्ष असल्याचं सांगितलं जात आहे. आरोपीला पोलिसांनी अटक केली असून अद्याप कोणतीची माहिती दिलेली नाही. 

Advertisement

Advertisement