आजपासून नोव्हेंबर (November) महिना सुरु झाला आहे. महिन्याच्या पहिल्या दिवशी म्हणजे, आज 1 नोव्हेंबर 2022 रोजी एलपीजीच्या दरांत (LPG Rates) घट झाल्याचं पाहायला मिळत आहे. केंद्र सरकारनं एलपीजी सिलेंडरच्या दरात कपात केली आहे. मात्र, देशभरातील व्यावसायिक एलपीजी सिलेंडरच्या दरात (Commercial Cylinder Price) ही कपात झाली आहे. आज (मंगळवार) 1 नोव्हेंबर 2022 पासून 19 किलोचा व्यावसायिक LPG सिलेंडर 115.50 रुपयांनी स्वस्त झाला आहे. पण, घरगुती एलपीजी सिलेंडरच्या किंमतीत कोणताही बदल झालेला नाही. 6 जुलैपासून घरगुती सिलेंडरच्या किंमत स्थिर आहेत.
बातमी शेअर करा