Advertisement

पुढच्या महिन्यात ई-ट्रक लॉन्च करणार - नितीन गडकरी

प्रजापत्र | Saturday, 29/10/2022
बातमी शेअर करा

सार्वजनिक वाहतूक (Public Transport) वाढवायला हवी, त्याला प्रयोरिटी देणं गरजेचं  आहे. जर सगळ्या गोष्टी लोकांना पब्लिक ट्रान्सपोर्टनं दिल्या तर त्याचा वापर होईल असे मत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Minister Nitin Gadkari)  यांनी व्यक्त केलं. देशात ई-हायवे बनवण्याचा आमचा प्लॅन आहे. त्यासाठी तुमची मदत हवी असल्याचे गडकरी म्हणाले. रिसर्च करा मी त्याला इन्करेज करतो असंही त्यांनी सांगितलं. दरम्यान, पुढच्या महिन्यात ई-बसनंतर ई-ट्रक लॉन्च करणार असल्याचेही गडकरी म्हणाले. तसेच मला पेट्रोल डिझेलला हद्दपार करायचं आहे, हा एक अवघड संकल्प असल्याचे गडकरी म्हणाले. मुंबई आयआयटीमध्ये आयोजीत करण्यात आलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते.

 

 

 

विद्वान बनणं आणि चांगला व्यक्ती बनणं हे खूप वेगळं आहे. नॉलेजसोबत संस्कार सुद्धा महत्वाचे आहेत. एनर्जी क्रायसेस सगळ्यात मोठी समस्या असल्याचे गडकरी यावेळी म्हणाले. ब्रिटिश पार्लमेंटमध्ये बोलायची संधी मिळाली त्यावेवी मी त्यांना विचारला की तुमच्या काय समस्या आहेत, ते म्हणाले समाजव्यवस्था बिघडली आहे, कुटुंबपद्धतीत लिव्ह इन रिलेशनशिप पद्धत वाढल्याचं त्यांनी सांगितल्याचे गडकरी म्हणाले.
 

Advertisement

Advertisement