स्टार प्लसवरील प्रसिद्ध मालिका 'ये रिश्ता क्या कहलाता है'मध्ये संजनाची भूमिका साकारणारी टीव्ही अभिनेत्री वैशाली ठक्करने आत्महत्या केली आहे. वैशालीचा मृतदेह इंदूरच्या साईबाग स्थित तिच्या घरी आढळला. तेजाजी नगर पोलिसांच्या माहितीनुसार, वैसालीने 16 ऑक्टोबर रोजी गळफास घेतला. तिचा मृतदेह शवविच्छेदनासाठी एम एस रुग्णालयात पाठवण्यात आला आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, उज्जैनच्या महिपालपूरची वैशाली ठक्कर गत वर्षभरापासून इंदूरमध्ये राहत होती. तिच्या मृतदेहाजवळ सुसाइड नोटही आढळली आहे. सकृतदर्शनी ही घटना प्रेम प्रकरणामुळे घडल्याचा दावा केला जात आहे.
बातमी शेअर करा