Advertisement

बापानेच केला अपंग मुलीवर अत्याचार

प्रजापत्र | Sunday, 18/09/2022
बातमी शेअर करा

सतिष वाघमारे

गेवराई : तालुक्यातील रेवकी देवकी येथील एका दहा वर्षीय अपंग मुलीवरच जन्मदात्या बापानेच अत्याचार केल्याची घटना रविवारी (दि.18) दुपारी अडीच्या सुमारास घडली आहे. दरम्यान या घटनेने बीड जिल्ह्यात खळबळ उडाली असून रविवारी रात्री 9.30 च्या सुमारास या प्रकरणात गेवराई पोलीसांकडून गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरु असल्याची माहिती एपीआय संदीप काळे यांनी प्रजापत्रशी बोलताना दिली.

रतन लक्ष्मण गोरे (वय45, रा.रेवकी देवकी) असे आरोपीचे नाव आहे. रतन गोरेने रविवारी दुपारी आपल्या राहत्या घरी जन्मदात्या अपंग मुलीवर बलात्कार केला. त्यानंतर सायं.5 च्या दरम्यान ही घटना समोर आल्याने खळबळ उडाली. पीडितेवर सुरुवातीला गेवराईच्या उपजिल्हा रुग्णालयात उपचार करण्यात आले. मात्र प्रकृती खालावल्याने तिला बीडच्या जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात येत असल्याची माहिती आहे. घटनास्थळी गेवराई पोलीस ठाण्याचे संदीप काळे यांनी भेट दिली होती. या प्रकरणातील निर्दयी बापाला गेवराई पोलीसांनी अटक केली असून रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु आहे. 

 

Advertisement

Advertisement