Advertisement

मंत्री शंकरराव गडाखांच्या वहिणी राहत्या घरात मृत आढळल्या

प्रजापत्र | Sunday, 08/11/2020
बातमी शेअर करा

मंत्री शंकरराव गडाखांच्या वहिणी राहत्या घरात मृत आढळल्या.गौरी गडाख यांचा दुपारीच मृत्यू झाला होता, मात्र सायंकाळी उशिरा ही माहिती सार्वजनिक झाली. या प्रकरणी पोलीस तपास करत आहे. गौरी गडाख यांना सायंकाळच्यावेळी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले, पण त्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झालेला होता. मृतदेहाचे शवविच्छेदन केल्यानंतरच मृत्यूच्या कारणाचा उलगडा होणार आहे, असी माहिती पोलिसांनी दिली आहे. या प्रकरणी नगरच्या तोफखाना पोलीस स्टेशनमध्ये अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. गडाख कुटुंबीय नगरच्या राजकारणातील मोठं नाव असल्याने या घटनेने खळबळ उडाली आहे.
 

Advertisement

Advertisement