मनसे आंदोलन अर्धवट सोडतो हा आरोप चुकीचा आहे. टोलबाबत भाजपला प्रश्न विचारला पाहिजे. टोल वसुलीबाबत राज ठाकरेंनी हल्लाबोल केला आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) आपल्या हिप बोनच्या शस्त्रक्रियेनंतर ॲक्टिव्ह मोडमध्ये आले आहेत. आज मनसेच्या (MNS) पदाधिकाऱ्यांचा मेळावा पार पडत आहे. मुंबईत मनसेच्या पदाधिकाऱ्यांचा मेळाव्यात राज ठाकरे बोलत होते. यावेळी राज्यभरातील मनसे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात मुंबईत दाखल झाले आहेत.
बातमी शेअर करा