प्रसिद्ध टिकटॉक स्टार आणि भाजपा नेत्या सोनाली फोगट यांचे निधन झाले आहे. त्या ४१ वर्षांच्या होत्या. आज (२३ ऑगस्ट) सकाळी त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या निधनाच्या बातमीने अनेकांना धक्का बसला. यामुळे लाखो चाहत्यांमध्ये शोककळा पसरली आहे. त्यांचा मृत्यू हृदयविकाराच्या झटक्याने झाल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सोनाली फोगट या काही कामानिमित्त गोव्याला गेल्या होत्या. त्यांनी त्यांच्या इन्स्टाग्रामवर काल रात्री याचे काही व्हिडीओ आणि फोटोदेखील शेअर केले आहेत. या फोटोत त्यांनी सुंदर फेटा परिधान केला होता. पण आज सकाळच्या सुमारास त्यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला आणि त्यातच त्यांचा मृत्यू झाला.
बातमी शेअर करा