Advertisement

फडणवीसांनी एकदा दाखविली, पण आता पुन्हा 'करुणा ' दाखविणार नाही

प्रजापत्र | Monday, 22/08/2022
बातमी शेअर करा

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा धनंजय मुंडेंना इशारा

 

मुंबई : मुख्यमंत्री असताना देवेंद्र फडणवीसांनी धनंजय मुंडेंवर प्रेम, दया, 'करुणा' दाखवली. मात्र, आता परत परत दया, 'करुणा' दाखवणार नाही, अशी तुफान फटकेबाजी आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अधिवेशनात केली. मुख्यमंत्र्यांचे हे विधान धनंजय मुंडे यांना इशारा असल्याचे मानले जात आहे.

 

राज्याचे नाथ म्हणवणाऱ्या एकनाथ शिंदे यांनी 'एकनाथ'च राहावे, 'ऐकनाथ' होऊ नये, अशी कोपरखळी आज अधिवेशनात धनंजय मुंडे यांनी मुख्यमंत्री शिंदेंना लगावली. त्याला मुख्यमंत्री शिंदेंनी आपल्या खास शैलीत प्रत्युत्तर दिले. मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, अधिवेशनाच्या पहिल्या दिवसापासून सभागृहाबाहेर धनंजय मुंडे आमच्याविरोधात घोषणा देत आहेत. अगदी कट्टर शिवसैनिक असल्याप्रमाणे बेबींच्या देठापासून 'ताट वाटी, चलो गुवाहाटी', असे म्हणत आमच्यावर निशाणा साधत आहे. पण, तुमचाही प्रवास मला माहिती आहे. फडणवीसांनी तुमच्यावर प्रेम, दया, 'करुणा' दाखवली म्हणूनच तुम्ही आता घोषणा देऊ शकत आहात. पण, परत परत अशी दया, करुणा दाखवता येणार नाही, असा सूचक इशाराही शिंदेंनी मुंडेंना दिला.

 

Advertisement

Advertisement