Advertisement

वय विचारले म्हणून द्यावी लागली चार लाखांची भरपाई

प्रजापत्र | Sunday, 21/08/2022
बातमी शेअर करा

मुलाखतीत महिलेचे वय विचारणे डॉमिनोजला चांगलेच महागात पडले आहे. वय व लिंगभेद केल्याचा आरोप झाल्याने डॉमिनोज कंपनीला महिलेला 4,250 पाऊंड (सुमारे 4 लाख रुपये) भरपाई म्हणून द्यावी लागली. याबाबत बीबीसीने वृत्त दिलेले आहे.

 

 

(उत्तर आयर्लंडमधील) नॉर्दर्न आयर्लंडमध्ये राहणाऱ्या जेनिस वॉल्श नावाच्या महिलेने स्ट्राबेन, काउंटी टायरोन येथील डॉमिनोजमध्ये पिझ्झा डिलिव्हरी चालक या नोकरीसाठी अर्ज केला होता. तेव्हा डॉमिनोज पिझ्झा फ्रँचायझीच्या मुलाखतीत जेनिसला तिचे वय विचारण्यात आले. जेनिस वॉल्शच्या म्हणण्यानुसार, तिचं वय आणि महिला असल्याने तिची या नोकरीसाठी निवड करण्यात आली नाही.

 

 

फ्रेंचायझीच्या मालकाने माफी मागितली
नोकरीसाठी निवड न झाल्याने जेनिसने स्टोअर मालकाला फेसबुकद्वारे मेसेज पाठवून तिच्यासोबत होणाऱ्या भेदभावाची माहिती दिली. यानंतर मुलाखतकाराने तिला फोन करून माफी मागितली. नोकरीच्या मुलाखतीदरम्यान कुणाचे वय विचारणे चुकीचे आहे. हे त्यांना माहित नसल्याचे तिला सांगण्यात आले. दरम्यान, फेसबुक मेसेजमध्ये जेनिसने स्ट्रॉबेन फ्रँचायझी आणि त्याचे पूर्वीचे मालक जस्टिन क्विर्क यांच्यावर भेदभावाचा आरोप केला. त्यानंतर क्विर्कने जेनिसला 4,250 पाऊंड भरपाई देण्याची मान्य केले व घटनेबद्दल माफी देखील मागितली.

 

 

निवड न होण्याचे कारण दुसऱ्यांकडून समजले
नोकरी न मिळाल्यानंतर, जेनिसला डॉमिनोच्या दुसऱ्या कर्मचाऱ्याकडून माहिती मिळाली की, 18 ते 30 वयोगटातील लोक या नोकरीसाठी योग्य मानले जातात. याशिवाय त्यांनी सांगितले की, आम्ही फक्त पुरुषांना ड्रायव्हरचे काम करताना पाहिले आहे. अशा परिस्थितीत मला असे वाटले की, मी एक महिला आहे म्हणून मला हे काम दिले गेले नाही, अशी नाराजी जेनिसने दिली.

 

 

समानता आयोगाकडे केली तक्रार
या सर्व प्रकारणानंतर जेनिसने वॉल्श यांनी उत्तर आयर्लंड समानता आयोगाकडे तक्रार केली. आयोगाने त्यांच्या कायदेशीर लढाईत त्यांना मदत केली. त्यांना नुकसानभरपाई मिळवून दिली. यात कंपनीकडून चार लाख व अन्य रक्कम अशी सुमारे सहा लाखांची मदत करण्यात आली.

Advertisement

Advertisement