Advertisement

एकाच कुटूंबातील पाच जणांचा तलावात बुडून मृत्यु

प्रजापत्र | Sunday, 21/08/2022
बातमी शेअर करा

नांदेड  – एकाच कुटूंबातील पाच जणांचा तलावात बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना नांदेड (Nanded) जिल्ह्यातील कंधार येथे घडली. मयतात दोन सख्खे भाऊ तर अन्य तीन जण चुलते आहेत.

 

 

( Unfortunate… five people of the same family drowned in the lake.)

 

 

नांदेड शहरातील खुदबई नगर येथील दोन कुटुंब कंधार येथील दर्गाहच्या दर्शनासाठी गेले होते. या कुटूंबातील पाच जण येथील जगतुंग तलावात पोहण्यासाठी गेले. पण पाण्याचा अंदाज न आल्याने पाचही जण बुडाले. सर्व मयत हे 15 ते 23 वयोगटातील आहेत.

 

मयतांची नावे
मोहम्मद विखार (वय 23), मोहम्मद साद मोहम्मद शफीउद्दीन (वय 15), सय्यद सोहेल सय्यद वाहिद (वय 20), मोहम्मद शफीउद्दीन मोहम्मद गफ्फार (वय 45), सय्यद नवीद सय्यद वाहिद (वय 15) अशी मृतकांची नाव आहेत. हे सर्व युवक नांदेडच्या खुदबेनगर येथील रहिवासी आहेत.

 

 

नेमकं काय घडलं 
नांदेडमधील खुदबई नगर येथील दोन कुटुंब कंधार येथे गेले होते. त्याठिकाणी त्यांनी दर्ग्याचे दर्शन घेतलं. लहान मुलं आणि महिला या दर्ग्यामध्येच होते. कुटुंबातील तरुण मुलं तलावात पोहण्यासाठी गेले. पण, पाण्याचा अंदाज आला नसल्यामुळं बुडून (drowned) त्यांचा मृत्यू झाला. सदर पाच जण बुडाल्याचे लक्षात येताच पोलिसांना माहिती देण्यात आली. यानंतर पाण्यातून मृतदेह बाहेर काढण्यात आले. सर्व मृतदेह कंधार येथील रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आले. यावेळी अनेक लोकांनी गर्दी केली होती. घरातील कर्ते तरुण गेल्यामुळं कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

 

Advertisement

Advertisement