गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या राज्यातील उप जिल्हाधिकाऱ्यांच्या पदोन्नती अखेरीस करण्यात आलेल्या आहेत. राज्यातील तब्बल ४५ उप जिल्हाधिकाऱ्यांची अपर जिल्हाधिकारी (Additional Collectors) म्हणून पदोन्नती करण्यात आली आहे. औरंगाबाद खंडपीठाने २०२१ मध्ये पात्र असलेल्या २०२१-२०२२ मधील उप जिल्हाधिकाऱ्यांच्या पदोन्नतीचे आदेश पारित केले होते. त्यानुसार महसूल व वन विभागाने तात्पुरत्या स्वरूपातील पदोन्नतीचा प्रस्ताव सामान्य प्रशासन विभागाला ता. २९ जुलै २०२२ ला सादर केला होता. सदर प्रस्ताव सादर केल्यानंतर सामान्य प्रशासनाच्या अधिपत्याखालील आस्थापन मंडळ क्र. २ ची बैठक ता. १२ ऑगस्ट २०२२ रोजी आयोजित करण्यात आली होती.
या अनुषंगाने अपार जिल्हाधिकारी या पदावर नियमित पदोन्नती कोट्यातील रिक्त पदांवर सध्या तात्पुरत्या स्वरूपात पदोन्नती करण्यात आली आहे. गेल्या काही वर्षांपासून हे पदोन्नती खोळंबल्या होत्या. यामध्ये एकूण ४५ पात्र उप जिल्हाधिकाऱ्यांना अपर जिल्हाधिकारी या पदावर बढती देण्यात आल्याचे आदेश अखेरीस पारित करण्यात आलेले आहेत.
यामध्ये प्रज्ञा त्र्यंबक बडे-मिसाळ, प्रदीप प्रभाकर कुलकर्णी, जगन्नाथ महादेव वीरकर, शिवाजी व्यंकटराव पाटील, दीपाली वसंतराव मोतियळे, संजय शंकर जाधव, प्रताप सुग्रीव काळे, निशिकांत श्रीधरराव देशपांडे, सुहास शंकरराव मापारी, मोनिका सुरजपालसिंह ठाकूर, स्नेहल हिंदुराव पाटील भोसले, मंदार श्रीकांत वैद्य, सरिता सुनील नरके, डॉ. राणी तुकाराम ताटे, मृणालिनी दत्तात्रय सावंत, पांडुरंग शंकरराव कावळे-बोरगावकर, नरेंद्र सदाशिवराव फुलझेले, सुषमा वामन सातपुते, अरुण बाबुराव आनंदकर (दिव्यांग-अस्थिव्यंग), रिता प्रभाकर मैत्रेवार, वंदना साहेबराव सूर्यवंशी, उपेंद्र गोविंदराव तामोरे, किरण संतोष मुसळे कुलकर्णी, देवदत्त विश्वंभर केकाण (दिव्यांग-कर्णबधीर), दत्तात्रय नागनाथ भडकवाड, सूर्यकृष्णमूर्ती कोतापल्ली, पद्माकर रामचंद्र रोकडे, संजय शेषराव सरवदे, सुभाष शांताराम बोरकर, शिवाजी तुकाराम शिंदे, सुनील पुंडलिक थोरवे, सदानंद शंकर जाधव, भाऊसाहेब गंगाधर फटागरे, सुनील विठ्ठलराव यादव, सुनील वसंतराव विंचनकर, विजय बिंदुमाधव जोशी, श्रीकांत वसंत देशपांडे, दादाराव सहदेवराव दातकर, अजित पडितराव साखरे, अनिल रामकृष्ण खंडागळे, हनुमंत व्यंकटराव आरगुडे, उत्तम राजाराम पाटील, मनोज शंकरराव गोहाड, अविनाश जानराव कातडे आणि बाबासाहेब रावजी पारधे या ४५ उप जिल्हाधिकऱ्यांची अपर जिल्हाधिकारी म्हणून पदोन्नती करण्यात आली आहे.