Advertisement

बोरीवलीत चार मजली इमारत कोसळली

प्रजापत्र | Friday, 19/08/2022
बातमी शेअर करा

बोरीवलीमधील चार मजली साईबाबा नगरमधील गितांजली इमारत कोसळल्याची घटना घडली आहे. घटनेची माहिती मिळताच तातडीने अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झालं असून बचावकार्य सुरू करण्यात आलं आहे. इमारतीच्या ढिगाऱ्याखाली काहीजण अडकल्याची भिती व्यक्त करण्यात आली आहे.

 

 

मुंबईत सर्वत्र दहीहंडीचा उत्साह शिगेला असताना बोरिवलीत दुपारी चार मजली इमारत कोसळली. बोरिवली पश्चिमेला असलेल्या साईबाबा नगरातील ही इमारत आहे. दुपारी साडे बारा वाजण्याच्या सुमारास ही दुर्घटना घडली. साईबाबा मंदिराजवळ असलेली गीतांजली ही चार मजली इमारत अचानक कोसळली. घटनास्थळी अग्निशमन दलाचे पथक आणि पोलीस पथक दाखल झाले आहे. दुपारी पाऊणच्या सुमारास अग्निशमन दलाने दुर्घटनेचा स्तर दोन असल्याचे जाहीर केले. त्यामुळे घटनेचे गांभीर्य वाढले आहे. घटनास्थळी मदतकार्य सुरू असून ढिगाऱ्याखाली कोणी अडकले आहे का? याबाबत अद्याप माहिती हाती आलेली नाही.
 

Advertisement

Advertisement